Home महाराष्ट्र Devendra Fadnavis’ secret blast :”अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी…”

Devendra Fadnavis’ secret blast :”अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी…”

"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."
amit-thackeray-offered-mlc-but-raj-thackeray

 

नांदेड (Nanded) :- आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले परंतु सदा सरवणकरांनी दिलेलं लॉजिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटलं. अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊ हे शिंदेंनी मला राज ठाकरेंशी बोलायला सांगितले. परंतु ते ठाकरे आहेत, त्यामुळे माघारीचा प्रश्न उरला नाही. राज म्हणाले की, तुम्हाला मदत करायची असेल तर करा, मी लढणार आहे असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं मुख्यमंत्री आणि माझ्याही मनात होते, त्याप्रमाणे राज ठाकरेंशी बोलणं झालं होते.

पण तिथले जे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. तुमचं नुकसान होणार नाही मी तुम्हाला विधान परिषद देतो असं मुख्यमंत्र्‍यांनी सरवणकरांना सांगितले. मात्र सदा सरवणकरांनी असं लॉजिक मांडले, आम्ही उबाठा सोडून इथं आलो आहोत. जर मी लढलो नाही तर ती मते थेट उबाठाला जातील ती अमित ठाकरेंना जाणार नाहीत. त्यामुळे हमखास उबाठाचा फायदा होईल.

Nanded wikipedia in marathi
Nanded map
Nanded in which District
Nanded distance
www.nanded.gov.in 2024
Nanded in which state
Nanded tourist places
nanded.nic.in marathi