Home राजकारण Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात

Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात
prime-minister-narendra-modi-in-maidan

विधानसभा प्रचारासाठी भाजपची स्टारकास्ट

मुंबई (Mumbai) :- राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागांचा घोळ जवळपास संपण्यात जमा आहे. ऐन दिवाळीत निवडणूक लागल्याने शा‍ब्दिक बॉम्ब, फटक्यांची लड लागणार आहे. आरोपांच्या फुलझड्या फेटणार आहेत. तर टीकेचे रॉकेट सुटणार आहे. अनेक नेते शब्द बंबाळ होणार आहेत. अनेकांना या फटक्यांचे चटके सहन करावे लागणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या टिकल्याच नाहीत तर सुतळी बॉम्ब राज्यातील जनतेचे मनोरंजन करणार आहे.

यंदा दिवाळीत टीव्हीवरील रंगारंग कार्यक्रमापेक्षा सभांमधील शा‍ब्दिक हल्ले अधिक भाव खाऊन जातील. त्यामुळेच अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह एकूण 40 जणांची मोठी टीम प्रचाराची धूरा सांभाळणार आहेत. पण या यादीत जीवाभावाचे मित्र आणि लाडके कवींचे नाव न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या लोकसभेत भाजपाने अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. पण विधानसभेसाठी अद्याप भाजपने (BJP) कोणताही नारा रेटला नाही. प्रचाराला अजून सुरूवात झालेली नाही. प्रचाराचा नारळ फुटल्यावर लागलीच मुद्दे आणि नारे जनतेच्या पुढ्यात येतील. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे.

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

Mumbai City
Mumbai map
Mumbai Indians
Mumbai district name
Mumbai News
Mumbai population
Where is Mumbai located in India
Flights to Mumbai