Home महाराष्ट्र ‘या’ नेत्याने दिला भाजपाचा राजीनामा

‘या’ नेत्याने दिला भाजपाचा राजीनामा

'या' नेत्याने दिला भाजपाचा राजीनामा
this-leader-resigned-from-bjp

लवकरच मोठा निर्णय घेणार

मुंबई (Mumbai) :- भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतली. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. भाजपकडून काही बंड थंड करण्यात आले. पण काही जण निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपला नवी मुंबईत मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. संदीप नाईक हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी तयारीही केली होती. आज ते वाशीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नाईक (Sandeep Naik) तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यास हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नाराज सर्वच ठिकाणी चाचपणी करत आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी देखील कोणत्याही परिस्थिती निवडणुकीला समोरे जाण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपला राम राम करत, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे. त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai Indians
Mumbai district name
Mumbai population
Where is Mumbai located in India
Flights to Mumbai
Mumbai city name list