Home महाराष्ट्र ‘सागर’ बंगला बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र

‘सागर’ बंगला बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र

‘सागर’ बंगला बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र
sagar-bungalow-became-the-center-of-assembly-elections

 

मुंबई (Mumbai) :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिलीयादी प्रसिद्ध केली होती. ही यादी पाहून भाजपच्या काही नेत्यांचा जीव भांड्यात पडला तर यादीत नाव नसलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला.

त्यामुळे आज सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपमधील नाराजांची ये-जा सुरु आहे.यामध्ये पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचा समावेश आहे. ते सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक बाळा भेगडे हेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे मावळच्या उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.

पुण्यातील खडकवासला विधानसभा विद्यमान आमदार भीमराव तापकीर सागरवर दाखल झाले आहे. भीमराव तापकीर यांचे नाव पहिल्या यादीत नाव नाही. मावळचे आमदार सुनील शेळके विरोधातील भाजपचे बाळा भेगडे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीला आला आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai Indians
Mumbai News
Mumbai district name
Mumbai population
Where is Mumbai located in India
Flights to Mumbai