Home महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होणार तिसऱ्या आघाडीचा प्रयोग

विधानसभा निवडणुकीत होणार तिसऱ्या आघाडीचा प्रयोग

विधानसभा निवडणुकीत होणार तिसऱ्या आघाडीचा प्रयोग
the-experiment-of-the-third-front-will-be-held-in-the-assembly-elections

4 नोव्हेंबरला करणार मोठा स्फोट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतला आहे. जनता महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली असून त्यांना नवीन पर्याय देण्याचा त्यांचा दावा आहे. त्यापूर्वी त्यांची विधान चर्चेत आहेत. तिसरी आघाडी राज्यात सक्षम पर्याय ठरणार का हे लवकरच समोर येईल. त्यापूर्वी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांविरोधात मोर्चा उघडला आहे. हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ते म्हणाले. 4 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल असे ते म्हणाले.जनता, महायुती- महाविकास आघाडीला कंटाळली आहे. या दोघांच्या जागा वाटपमध्ये तिढा आहे. भाजप काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही, अशी टीका बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर केली. तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने जनता आपल्या पाठीशी राहण्याचा दावा त्यांनी केला आहे.

उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल, असे ते म्हणाले. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझा विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजन तेली किंवा त्याबद्दल मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची न्यूज तुम्ही चालवली, कशी झाली मला माहिती नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो. आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार असे ते म्हणाले.

निवडणुकीत आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. 4 तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल, 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे. चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसतील. युती आणि आघाडी, त्या दोघांना पाहिले पडायचे, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. जसे इतर पडतात तसे तेही पडतील, असे ते म्हणाले.

Bacchu Kadu wife
Bacchu Kadu religion
Bacchu Kadu cast
Bacchu Kadu wikipedia
Bacchu Kadu Family
Bacchu Kadu son
Bacchu Kadu details
Bacchu Kadu information in marathi