Home महाराष्ट्र ‘या’ ठिकाणी होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा

‘या’ ठिकाणी होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा

'या' ठिकाणी होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
dussehra-gathering-of-pankaja-munde-will-be-held-at-this-place

 

धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर

बीड (Beed) :- दसरा मेळाव्याचे औचित्य साधून राज्यांमध्ये अनेक राजकीय पक्ष संघटना हे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. मात्र, या दिवशी होणाऱ्या राजकीय मेळाव्यांना वेगळं महत्त्व असतं. बीड जिल्ह्यात पारंपरिक भगवान भक्ती गडाचा पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असतानाच तिकडे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायण गडावरती दसरा मेळावा होणार आहे. त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी स्टेज बनवण्यात येत आहे त्यासोबतच या ठिकाणी आलेल्या मुंडे (Pankaja Munde) समर्थकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे या व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. मराठा फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदरासंघात धक्कादायक पराभव झाला होता. शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषेदवर पाठवून भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. विधानसभेलाही मराठा आणि ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भगवान गडावरुन काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना लक्ष्य करणार का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास मनोज जरांगे हे नारायण गडावरील मेळाव्यातून या टीकेला प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर बीड आणि मराठवाड्यात निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

Beed sankalp
Beed wikipedia
www.beed.gov.in 2024
beed.gov.in recruitment
Beed is famous for what
Beed nic kunbi
Beed Live
Beed Collector list