Home महाराष्ट्र अमित शाहांचे मिशन मुंबई

अमित शाहांचे मिशन मुंबई

अमित शाहांचे मिशन मुंबई
amit-shahanche-mission-mumbai

 

दोन दिवसीय दौऱ्यात आखली जाणार विशेष रणनिती

मुंबई (Mumbai) :- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमित शाह यांचे मुंबईत स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईत झळकताना दिसत आहेत. अमित शाह यांनी आज दुपारी 1.30 वाजता मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील बैठकीनंतर अमित शाह हे संध्याकाळी 4.30 च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील

Mumbai temperature today
Mumbai City
Mumbai map
Mumbai Pin Code
Mumbai Indians
Mumbai population
Mumbai district Name
Mumbai city name