प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची ई-पायाभरणी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची ई-पायाभरणी
e-foundation-of-pm-mitra-textile-park-by-prime-minister

जिल्ह्यातील १३ केंद्राचे करण्यात आले उ‌द्घाटन

अमरावती (Amravati) :- नजीकच्या नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीत पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी थाटात ऑनलाइन पायाभरणी करण्यात आली. वर्धा येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधानांनी रिमोटद्वारे पायाभरणी करताना पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, भाजपा सरचिटणीस नितीन गुडधे, डिगर गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा बाजारे, पिंपर विहीरच्या सरपंच मुक्ता ठाकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, सहायक पोलिस आयुक्त सागर पाटील, के. एम. पुंडकर, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर, वस्त्रोद्योग उप वस्त्रोद्योग अभियंता सुधीर अमृतकर, तहसीलदार वैशाली पाथरे, उप अभियंता संजय विधळे, उप अभियंता राठोड, क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  (Narendra Modi) हस्ते वर्धा येथून करण्यात आले. यात जिल्ह्यातील १३ केंद्राचे उ‌द्घाटन करण्यात आले आहे.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत पुसदेकर, सदस्य सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. दिनेश खेडकर, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

Amravati history in marathi
Amravati is in which state
Amravati map
Amravati Hyderabad
Amravati famous for
Amravati gov in
Amravati History
Amravati Division district List