दिवाळीनिमित्त रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय

दिवाळीनिमित्त रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय
This decision of the railway administration on the occasion of Diwali

पुणे:- प्रवाशांना दिवाळीच्या काळात गावी जाता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून नागपूर, हजरत निजामुद्दीन, दानापूर, गोरखपूर आणि सावंतवाडी या पाच मार्गांवर विशेष गाड्या धावतील. या गाड्यांच्या एकूण ८८ फेऱ्या होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

१ पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल : २५ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. हजरत निजामुद्दीनहून ही गाडी दर शनिवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे,. २. पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक : २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दर शनिवारी नागपूरहून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. पुण्याहून दर रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी गाडी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आदी स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.