Home जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
the-union-home-minister-visited-ganaraya-at-the-varsha-residence-of-the-chief-minister

मुंबई (Mumbai) ९ सप्टेंबर :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह (Amit Shah) यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.