Home विदर्भ महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील
with-the-blessings-of-mahanubhava-panth-fadnavis-will-become-the-chief-minister-again

आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

नागपूर (Nagpur) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरु असून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप युती आणि आघाडीने स्पष्ट केलेले नाही. एकीकडे महायुतीने हि निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले असले तरीही मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याची माहिती आहे.

अश्यातच आता भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य करत ‘राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत,’ अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस हे स्वतः (Devendra Fadnavis) मंचावर उपस्थित होते. यामुळे महायुतीत अद्यापही मुख्यमंत्रीपदावरून काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात विधानपरिषद आमदार परिणय फुके बोलत होते.  फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहे, तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचं  महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला. तर फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे परिणय (Parinay Fuke) फुके म्हणाले.

Devendra Fadnavis’ first wife
Devendra Fadnavis WhatsApp number
Devendra Fadnavis PA list
Devendra Fadnavis PA name
Devendra Fadnavis PA Contact Number
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्क
Devendra Fadnavis age
Devendra Fadnavis cast