12 लाख रोजगारांची निर्मिती
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे विरोध पक्ष सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जनतेसाठी विविध योजनांच्या घोषणा केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी 2024 विधानसभेसाठी मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं भेटवस्तूंचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे
कोट्यवधी प्रकल्पांच्या माध्यमांतून लाखो रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील पालघरमध्ये उभारण्यात येणार असलेलं वाधवन बंदर अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे. या बंदराची चर्चा सध्या जागतिक स्तरावर रंगल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे बंदर पूर्ण होऊन सुरू झाल्यानंतर तब्बल 12 लाखांपर्यंतचे रोजगात निर्माण होणार आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे ग्रीन-फील्ड मेगा कंटेनर पोर्ट अंदाजे 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीने विकसित केलं जात आहे. तसेच, अनेक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे बंदर जलवाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
पालघर येथील सिडको मैदानावर बंदर प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित करताना बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं सागरी राष्ट्र म्हणून जगात नाव कमावलं आहे, ज्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये सागरी क्षेत्रासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत.




