Home महाराष्ट्र नवनीत राणा यांचा अचलपूर जिल्हा निर्मितीचा संकल्प

नवनीत राणा यांचा अचलपूर जिल्हा निर्मितीचा संकल्प

नवनीत राणा यांचा अचलपूर जिल्हा निर्मितीचा संकल्प
Navneet Rana's resolution to create Achalpur district

अमरावती:- माजी खासदार नवनीत राणा यांनी धारणी येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीमध्ये अचलपूर जिल्हा निर्मितीचा संकल्प केला तसेच अमरावती (Amravati) परतवाडा – धारणी – खंडवा या रस्त्याला राष्ट्रीय महामर्गाचा दर्जा मिळवून देणार असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली. या दहीहंडीपूर्वी चित्रपटसृष्टीतील खलनायक गुलशन ग्रोअर यांच्या समवेत राणा दाम्पत्याने धारणी शहरात रोड शो करीत नागरिकांचे मनोरंजन केले. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी आयोजीत करण्यात आली होती. रोड शोच्या वेळी रस्त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा हजारो युवक, महिला व पुरुषांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. नवनित राणा व आ.रवि राणा यांनी उपस्थितांच्या साक्षीने भ्रष्टाचाराची दहीहांडी फोडून मेळघाटात होत असलेल्या आमदाराच्या भ्रष्टाचाराची विशेष चौकशी करणार असल्याचे व यापुढे कोणत्याही गोरगरिब आदिवासींचा पैसा आमदाराला खाऊ देणार नाही, असा इशारा दिला.

दहीहांडीमध्ये मेळघाटातील प्रसिद्ध आदिवासी नृत्याची स्पर्धा घेण्यात आली. मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार राणा दाम्पत्यासह माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवनित राणा यांनी अमरावतीमध्ये होत असलेल्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण मेळघाटातील आदिवासी जनतेचा उपचार होणार असल्याचे सांगितले. मेळघाटामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून काम करणाऱ्या आदिवासी कामगारांचा पगार २७५ रुपयांवरुन ६०० रुपये करणार असून प्रत्येक आदिवासी कुंटूबाला घरकूल उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.