Home महाराष्ट्र सणांचा महिना सप्टेंबर, उत्सवांची राहणार रेलचेल

सणांचा महिना सप्टेंबर, उत्सवांची राहणार रेलचेल

सणांचा महिना सप्टेंबर, उत्सवांची राहणार रेलचेल
September is the month of festivals, Railchel will be full of festivals

अमरावती:- आगामी सप्टेंबर महिना हा सण उत्सवाची मोठी पर्वणी ठरणार आहे. या महिन्यात हिंदू धर्मीयांचा बैलपोळा, गौरी, गणेशोत्सव, जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व, इस्लाम धर्मीयांचा ईद असे सण साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत सर्वत्र उत्साह, भक्ती, चैतन्याचे वातावरण असणार आहे. तसेच सप्टेंबरमध्ये धार्मिक स‌द्भावना आणि ऐक्याचा संगम पाहायला मिळणार आहे.

श्रावण महिन्याचा समारोप अमावास्येला होत असून, दि. २ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण म्हणजे बैलपोळा येत आहे. वर्षभर शेतीत खांद्यावर ओझे घेऊन काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला जाणार आहे. यंदा पाऊसमान चांगले असून, खरिपातील पिके सुस्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या जीवाभावाच्या लाडक्या बैलांना साज चढवून धूमधडाक्यात पोळा सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत.

दि. ६ सप्टेंबर रोजी हरितालिकेला महिला महादेवाची पूजा करून उपवास व धार्मिक विधी करणार आहेत. दि. ८ सप्टेंबर रोजी ऋषि पंचमीला असून, या दिवशी जैन न बांधवांकडून पर्युषण पर्व साजरा केले जाणार आहे. अभिषेक करून दि. १७ सप्टेंबर रोजी पर्युषण पर्वाची सांगता करण्यात येणार आहे. यासोबतच दि. १६ . सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण के आला असून, तो उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

महिनाभरात सणासुदीच्या जवळपास ९ सुट्या सप्टेंबर महिन्यात पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, पर्युषण पर्व, ईद ए मिलाद या विविध धार्मिक सणांची भाविकांना मेजवानी मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात विविध धार्मिक सण व सार्वजनिक महोत्सव सलग आल्याने आणि या महिन्यात जवळपास ९ दिवस सुटी आहे. त्यामुळे सुटी, विविध सण व सार्वजनिक महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे.

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता

दि. ७ सप्टेंबरला गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे, त्यामुळे या उत्सवाची भाविकांना ओढ लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी विविध गणेश मंडळांकडून ठिकठिकाणी ढोल – ताशांचा गजरात श्री गणरायाचे आगमन होणार आहे. सायंकाळपर्यंत श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. या दरम्यान सलग ११ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात येणार आहे.