Home विदर्भ Nagpur News : मराठी भाषेची लज्जास्पद थट्टा

Nagpur News : मराठी भाषेची लज्जास्पद थट्टा

Nagpur News : मराठी भाषेची लज्जास्पद थट्टा
nagpur-news-shameful-mockery-of-marathi-language

पर्यटन मंत्रालय निवडणार आई!

नागपूर (Nagpur) :- सरकारचे आणि त्यातल्या त्यात सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी वेळ महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने आणली आहे. कारण या विभागाने, स्वतःच्या विभागाच्या प्रसृत जाहिरातीतून चक्क आई निवडण्याची अफलातून करामतीदार योजना जाहीर केली आहे.
इतकेच नव्हे तर, आईच्या निवडीचे निकषही या विभागाच्या हुशार अधिकाऱ्यांनी घोषित केले आहेत.ही जाहिरात जर राज्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या सहमती आणि परवानगीने मार्गी लागली असेल, तर मंत्र्यांच्या अकलेचेही दिवाळे निघाले असल्याचे वेगळ्याने सांगण्याची गरज उरत नाही.

तर, सांगण्याचा मुद्दा असा की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने, या क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठलीशी एक योजना जाहीर केली आहे. योजनेच्या घोषणेसाठी एक जाहिरातही पर्यटन विभागाच्या हुशार अधिकाऱ्यांनी तयार केली आहे. पण ती तयार करताना शब्द प्रयोगाचे भान राखण्यास अधिकारी विसरले आणि ही जाहिरात एकीकडे हास्याचा आणि दुसरीकडे जनभावना दुखावणारा विषय देखील ठरला आहे. कारण यात ‘आई’ निवडण्याच्या निकषांचा उल्लेख आहे. यातील आई हा इंग्रजीतील प्रदीर्घ योजनेचा शाॅर्टफाॅर्म असावा कदाचित, पण तरीही मराठी भाषेत असे शब्द वापरताना राखावयाचे भान पर्यटन विभागाच्या हुशार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात राखलेले दिसत नाही. अन्यथा ‘आई निवडण्याचे निकष’ असा चुकीचा अर्थ ध्वनित करणारा शब्दप्रयोग इथे झाला नसता.

पण, सरकारी यंत्रणा शेवटी सरकारीच असते. भावनेशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो. अन्यथा कुठल्याही भावना प्रधान माणसाला हा शब्दप्रयोग खटकला असता अन् या जाहिरातीची रचना बदलली असती. पण, खुद्द मंत्र्यांच्या पुढाकारानेच महिलांसाठीची ही जाहिरात, त्यांच्यासाठीच्या योजना जाहीर करतानाच, त्याच महिलांचा धडधडीत अपमान करून गेली नसती. आणि कहर म्हणजे, हा अपमान उघड्या डोळ्यांनी बघितला आणि खपवून घेतला गेला नसता. पण पर्यटन विकासाच्या नावाखाली ‘आईच्या निवडीचे निकष’ जाहीर करण्याचा अश्लाघ्य प्रकार बिनधास्त सुरू आहे.

Nagpur is famous for
NMC Nagpur property tax receipt
Index number for property tax Nagpur
Nagpur which state
Nagpur map
NMC property tax Nagpur online
nagpur.gov.in application form
GeoCivic property tax Nagpur