Home विदर्भ Nagpur News : नितीन गडकरींचं मोदी- शहांमुळे महत्त्व कमी

Nagpur News : नितीन गडकरींचं मोदी- शहांमुळे महत्त्व कमी

Nagpur News : नितीन गडकरींचं मोदी- शहांमुळे महत्त्व कमी
nagpur-news-nitin-gadkaris-importance-is-less-due-to-modi-shah

नागपूरकरांची खंत

नागपूर (Nagpur) :- नितीन गडकरी हे जाती-धर्माच्या वर उठून राजकारण करतात. त्यामुळे ते प्रत्येक जातीधर्मातील लोकांना हवेहवेसे वाटतात. ते फक्त विकासाची गोष्ट करतात, त्यामुळे त्यांची स्वीकार्यता इतरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घातलेच पाहिजे, असे मत नागपुरातील सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एवढेच वरिष्ठ आणि अनुभवी नितीन गडकरी आहेत (Nitin Gadkari) . मात्र मोदी आणि शहांमुळे त्यांना मिळावे तेवढं महत्त्व मिळत नाही, आता महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींच्या सक्रियतेतून त्यांना ही तितके महत्त्व मिळावे, अशी अपेक्षा नागपुरातील सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. तर राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे  यांच्यात थेट लढतीत गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे.

असे असताना नितीन गडकारींनी आजवर  विकासाचे राजकारण केलंय. त्यांनी कधीही जाती-पातीला आणि पक्षाला विकासाच्या आड येऊ दिले नाही. मात्र देशभर आपल्या विकासाचे जाळं विणणाऱ्या गडकारींना त्यांच्याच पक्षात हवं तितके महत्व मिळत नसल्याची खंत नागपूरकरांनी  बोलून दाखवली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळावी, अशी इच्छाही काही नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

Nagpur News
Nagpur is famous for
NMC Nagpur property tax receipt
Index number for property tax Nagpur
Nagpur which state
Nagpur map
NMC property tax Nagpur online
nagpur.gov.in application form