Badlapur incident : शाळेतील २ मुलींवर लैंगिक अत्याचार

Badlapur incident : शाळेतील २ मुलींवर लैंगिक अत्याचार
badlapur-incident-sexual-assault-on-2-school-girls

शाळेचे कर्मचारीही निलंबीत

बदलापूर (Badlapur) :- बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी हा शाळेतील सफाई कर्मचारी असून त्याला अटक करण्यात आल्यानंतरही पालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून झाल्याचा आरोप केला जात आहे. सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याचसाठी आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर शहरातील रिक्षाही आज बंद असून संतप्त बदलापूरकर प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरत रेल रोको केला. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. बदलापूरमधील हे आंदोलन सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच आंदोलनातील काही महिलांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित (Badlapur Crime) नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल या महिलांनी महायुती सरकारला विचारला आहे.

Badlapur crime today
Badlapur crime news
Badlapur News today marathi
Badlapur train News today LIVE
Badlapur Accident News Today