राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शनिवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शनिवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर
NCP leader Sharad Pawar on a visit to Wardha on Saturday

भाजप नेते नितीन गडकरी राहणार कार्यक्रमाला उपस्थित

वर्धा(Wardha):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शनिवारी सहकार नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते नितीन गडकरी राहणार कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी 2 वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे.