Chandrapur Accident : 4 जणांचा जागीच मृत्यू

Chandrapur Accident : 4 जणांचा जागीच मृत्यू
chandrapur-accident-4-people-died-on-the-spot

उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर शहरातून अपघाताची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर येथे आज पाहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या भरधाव कारने जबर धडक दिली आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत असून गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेच्या रात्री हे सर्व जण अर्टिगा कार क्रं.एम एच ०४, एफ आर ४६८१ या कारने चंद्रपूरवरून गडचांदूरकडे येत असताना गडचांदूरपासून अवघ्या ६ ते ७ किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी गावाच्या मधात उभ्या ट्रक क्रं.एम एच १८, एन ६६५६ ला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.गंभीर जखमी असल्याने एकाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

Chandrapur newspaper
Chandrapur wikipedia in marathi
Chandrapur in which district
Chandrapur distance
Chandrapur is famous for
Chandrapur tourist places
Chandrapur in which state
ZP Chandrapur