नागपूर विद्यापीठात बनावट पदवीचे लोण!

नागपूर विद्यापीठात बनावट पदवीचे लोण!
Fake degrees in Nagpur University!

ट्रान्स्क्रिप्ट साक्षांकनादरम्यान भांडाफोड

नागपूर:- बनावट पदवीचे लोण आता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) पर्यंत पोहचल्याचे नव्यानं समोर आले आहे. यात विद्यापीठात चक्क बनावट पदवी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपी बनावट ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यासाठी बनावट पदवी घेऊन विद्यापीठात पोहचले होते.

मात्र, दस्तावेज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आली आणि या प्रकारचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका संशयित आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.