अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
Amit Shah on 3-day visit to Maharashtra

भाजपाची रणनीती ठरणार

मुंबई:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे नुकतेच ३ दिवसीय दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतलेत तर दुसरीकडे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. येत्या १६, १७ आणि १८ ऑगस्टला अमित शाह राज्यात असतील.

या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकी घेतील. प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची रणनीती यावेळी ठरवण्यात येईल.