कोल्हापूरचे प्राचीन वैभव संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी !

कोल्हापूरचे प्राचीन वैभव संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी !
Kolhapur's ancient glory Sangeetsurya Keshavrao Bhosle Theater in fire!

 

कोल्हापूर:- कोल्हापूरचे प्राचीन वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (keshavrao bhosale natyagruha) गुरुवारी रात्री १० वाजता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत नाट्यगृहाची वास्तू जळून गेली आहे आणि केवळ दगडी बांधकाम शिल्लक राहिले आहे. अग्निशमन दलाच्या विविध पथकांनी अथम परीश्रम घेऊन आग विझवली. कोल्हापूर (kolhapur) शहराचा सांस्कृतिक वारसा भस्मसात झाल्याने अनेक कलाकार, अभिनेते, नाट्यप्रेमी यांनी हळहळ व्यक्त केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

केशवराव भोसले नाट्यगृहात ९ ऑगस्टला जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती; मात्र आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली. घटना घडल्याचे कळल्यावर राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रात्रीच भेट देऊन याच्या पुनर्उभारणीसाठी १० कोटी रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्टला या संदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन ‘जुने बांधकाम’ कायम ठेवून नाट्यगृहाची उभारणी केली जाईल. महापालिकेने ८ दिवसांत त्या संदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या सचिवांनी दूरभाष करून महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून दूरभाषद्वारे याची सविस्तर माहिती घेतली.