West Bengal : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

West Bengal : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
West Bengal: Former Chief Minister Buddhadev Bhattacharya passed away

वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadev Bhattacharya) यांचे निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी 8.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना जुलैमध्ये रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून सीओपीडी (chronic obstructive pulmonary disease) आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या कोलकाता येथील घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे. माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 2015 मध्ये भट्टाचार्य यांनी CPI च्या पॉलिट ब्युरो तसेच त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांच्या शारीरिक त्रासात वाढ झाली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील वुडलँड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. (West Bengal) बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच वुडलँड्समधून माजी मुख्यमंत्र्यांच्या पाम अव्हेन्यू येथील घराकडे रुग्णवाहिका पाठवण्यात आली. वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिक्स रुग्णवाहिकेतून पाम अव्हेन्यू येथे आले आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आलं.

West bengal rajdhani
West Bengal Government website
West Bengal Map
Governor of West Bengal
Government of West Bengal office
West Bengal population
West Bengal population by religion
West Bengal Tourism online booking