Home महाराष्ट्र Tadoba : वाघिणीच्या लघुपटाला इटलीत पुरस्कार

Tadoba : वाघिणीच्या लघुपटाला इटलीत पुरस्कार

In Tadoba : वाघिणीच्या लघुपटाला इटलीत पुरस्कार
in-tadoba-award-in-italy-for-vaghinis-short-film

‘गोल्डन लीफ’ पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार मिळाला. प्रकल्पातल्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा तिचा व्हिडिओ समाज माध्यमावर झाला व्हायरल होता. नागपूरचे छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्याची क्षमता आहे ती ताडोबातील वाघांमध्येच. जागतिक पर्यटन नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर आहे. अर्थातच त्यात ताडोबातील वाघांचे योगदान आहे.

अलीकडेच याच ताडोबा (Tadoba) व्याघ्रप्रकल्पातील ‘नयनतारा’ या वाघिणीने थेट इटलीत धडक मारली. इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहोळ्यात ‘गोल्डन लीफ’ पुरस्कारावर या वाघिणीने नाव कोरले.काही महिन्यांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला या बफर क्षेत्रात ‘नयनतारा’ या वाघिणीचा वाहत्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला. जगभरातच या व्हिडीओची चर्चा झाली. तब्बल २३ सेकंदांचा हा व्हिडीओ वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केला होता.

Tadoba in marathi
Tadoba wikipedia
Tadoba safari booking
Tadoba resorts
Tadoba official website
Tadoba jungle
Tadoba tiger reserve
Things to do in tadoba