Amravati : कोरोनाचे 4 स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळले

Amravati : कोरोनाचे 4 स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळले
amravati-4-swine-flu-cases-confirmed-in-amravati

अमरावती (Amravati) 06 ऑगस्ट:- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून गत आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी असे दोनदिवस ११४ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, यात चार कोरोना पॉझिटिव्ह, तर स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहे. दहा रुग्णांचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अमरावती शहरात झपाट्याने कोरोना आणि स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.

विद्यापीठ प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांच्या माहितीनुसार, आरोग्य प्रशासनाकडून शुक्रवार २ ऑगस्ट रोजी ९४ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी चार रुग्ण कोरोना (corona) पॉझिटिव्ह – आढळून आले आहेत. तर यात दहा रुग्णांचे नमुने पुणे येथे चाचणीकरिता पाठविले आहेत. या दहा रुग्णांचा चाचणी अहवाल या आठवड्यात प्राप्त होण्याची शक्यता आहे. तर शनिवार, ३ ऑगस्ट रोजी २० रुग्णांचे नमुने तपासणी साठी आले असता यात ३ रुग्णांना स्वाइन फ्ल्यू (Swine flu) असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तिनही रुग्ण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. अचानक वातावरणात झालेला बदल आणि पावसाचे दिवस असल्यामुळे साथरोग बळावत आहे. घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव हे देखील कोरोना, स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढीस कारणीभूत ठरत आहे.

Amravati nagpur
Amravati wikipedia
Amravati is in which state
Amravati Map
Amravati Hyderabad
Amravati is the capital of which state
Amravati famous for
Amravati gov in