Home महाराष्ट्र Nitin Gadkari : जनता दरबारात दीड हजारहून अधिक समस्या

Nitin Gadkari : जनता दरबारात दीड हजारहून अधिक समस्या

Nitin Gadkari : जनता दरबारात दीड हजारहून अधिक समस्या
nitin-gadkari-more-than-1500-issues-in-janata-durbar

नागपूर (Nagpur) :- शहरात एवढ्या समस्या आहेत. प्रत्येकवेळी समस्यांची यादी वाढत जात आहे. माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात. माझ्या कायर्यालयामार्फत तुम्हाला पत्र येते. पण तरीही लोकाच्या अडचणी काही कमी होत नाहीत. तुम्ही प्रामाणिकपणे लोकांची कामे करा, नाहीतर नोकरी गमवाल, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनी अधिकाऱ्यांना सुनावले.

नितीन गडकरीचा (Nitin Gadkari) जनता दरबार यंदा नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला. नागपुरातील हजारो नागरिक आपल्या समस्या व अडचणींची निवेदने घेऊन याठिकाणी आले होते . महापालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये गडकरींनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. समस्या सांगितली की लगेच संबंधित विभागातील आणि झोनमधील अधिकान्याला गडकरी जाब विचारत होते. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर सर्वांसमोर त्यांच्या खास शैलीत गडकरी खडसावतही होते. लोकांची कामे केली नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागेल, असेही गडकरींनी काही अधिकाऱ्याऱ्यांना म्हटले.

मनपाच्या (Municipality) दहाही झोननिहाय तत्काळ नियोजन करून नागरी समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्याऱ्यांना दिले व शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे घरात पाणी शिरले, रस्त्यावर पाणी तुंबून राहिले. गटार लाईन चोक झाल्यामुळे सांडपाणी बाहेर आले, रस्त्यावर खड्डे पडले अशा दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व समस्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे झोन निहाय तपासणी करून अहवाल सादर करा, असे निर्देशही गडकरींनी आयुक्तांना दिले.

यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर, यांची उपस्थिती होती. याशिवाय सर्व झोनचे अधिकारी देखील उपस्थित होते.

नागपुरातील विविध भागातील नागरिक आपल्या अडचाणी घेऊन पोहोचले. यावेळी गडकरींनी विधानसभानिहाय नागरिकाची निवेदने स्वीकारली. कुणी पाण्याची समस्या, कुणी ड्रेनेजची, तर कुणी रस्त्याच्या समस्या घेऊन आले. समस्या सोडविण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती गडकरीनी अधिकाऱ्याकडून तिथेच घेतली. त्यानंतर कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर नागरिकाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे गडकरीनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Nagpur in marathi
Nagpur wikipedia
Nagpur is famous for
Nagpur area
Nagpur in which state in Map
NMC Nagpur property tax receipt
Nagpur map
Index number for property tax Nagpur