Car Attacked : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

Car Attacked : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला
Car Attacked : Jitendra Awad's car attacked

पोलिसांसमोरच फोडली गाडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रमुख जितेंद्र आव्हाड  यांच्या चालत्या गाडीवर भर रसत्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं.

या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. ते संभाजीनगर येथून ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.