Home Breaking News Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर

Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर

Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर
Amit Shah In Nashik :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार सोबतीला

नाशिक (Nashik) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परिषदेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नियोजित असल्याने या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक सरकारी यंत्रणांनी गुरुपीठ कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला. एप्रिलमध्ये स्वामीसेवा मार्गाच्या वतीने चंद्रकांत मोरे आणि डॉ. दिगपाल गिरासे यांनी दिल्लीत अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेत येथील कामांची माहिती दिली होती. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्ग संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुमारे 10 हजार केंद्राच्या माध्यमातून करत असलेल्या अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याबाबत त्यांना माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठास भेट देण्याची विनंती केली. सेवामार्गाच्या या विनंतीस मान देऊन शहा जागतिक योग दिनी त्र्यंबकेश्वर नगरीत समर्थ गुरुपीठावर येत आहेत. त्यानुसार शहा जागतिक योग दिनी गुरुपिठाला भेट देणार आहेत.