Home राष्ट्रीय Paris Olympics 2024 : टीम इंडियाचा पराभव टळला

Paris Olympics 2024 : टीम इंडियाचा पराभव टळला

Paris Olympics 2024 : टीम इंडियाचा पराभव टळला
Paris Olympics 2024 : Team India was defeated

अर्जेंटीना विरुद्धचा सामना 1-1 ने ड्रॉ

पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेतून मोठी अपडेट आली आहे. हॉकी टीम इंडियाला न्यूझीलंडनंतर अर्जेटिंनावर मात करुन सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयश आलं आहे. भारताने सलग दुसरा विजय मिळवावा, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र भारताला विजय मिळवता आला नसला, तरी त्यांनी सामना गमावलेला नाही. टीम इंडियाचा पूल बीमधील दुसरा सामन्यात अर्जेंटीना विरुद्ध होता. टीम इंडियाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने अखेरच्या क्षणी गोल करुन सामन्यात बरोबरी करुन दिली. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना बरोबरीत सोडवण्यात यश आलं आहे. दरम्यान टीम इंडियाचा तिसरा सामना हा आयर्लंड विरुद्ध होणार आहे.

पहिल्या सत्रात टीम इंडिया (Team India) आणि अर्जेंटिना (Argentina) दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध चिवट प्रतिकार केला. दोन्ही संघांना पहिल्या सत्रात गोल करता आला नाही. त्यामुळे पहिला सत्र 0-0 ने बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना वेध होते ते खातं उघडण्याचे. अर्जेंटिनाला दुसऱ्या सत्रात खात उघडण्यात यश आलं. अर्जेंटिनाने गोल करत टीम इंडिया विरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियावर खातं उघडण्यासह बरोबरी करण्याचं दुहेरी आव्हान होतं. मात्र अर्जेंटिनाने टीम इंडियाला चांगलाच झुंजवला.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी तिसऱ्या सत्रात गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र अर्जेंटीनाच्या खेळाडूंपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले. अर्जेंटीनाच्या खेळाडूंनी आपल्या आघाडीचा यशस्वीपणे बचाव केला, मात्र त्यांना दुसरा गोल काही करता आला नाही. अशाप्रकारे तिसऱ्या सत्राचा खेळ आटोपला