Home महाराष्ट्र Bhandara : वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर

Bhandara : वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर

Bhandara : वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर
Bhandara : wainganga river overflowing due to heavy rain

भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सतर्कतेचा इशारा

भंडारा (Bhandara) :-  भंडारा जिल्ह्यात मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बपेरा येथिल पुलावर चार फूट पाणी असुन महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे, तर वैनगंगा नदीने देखिल धोका पातळी ओलांडली आहे. भंडारा जवळील कारथा छोट्या पुलावर देखील पाणी असल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे. व गोसेखुर्द धरनाचे 33 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीची (Wainganga River) धोक्याची पातळी 245.50 ही मध्यरात्री ओलांडली आहे. भंडारा जिल्ह्यात मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू असल्याने वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे.

वैनगंगा नदी का इतिहास
वैनगंगा नदी का ऐतिहासिक महत्व
वैनगंगा नदी map
वर्धा वैनगंगा संगम कोठे होतो
वैनगंगा नदी माहिती मराठी
वैनगंगा तथा पैनगंगा किसकी सहायक नदी है
वैनगंगा की सहायक नदी
वैनगंगा नदी की लंबाई कितनी है