आजचे बजेट म्हणजे जुन्या घोषणांना नविन फोडणी – खा. धानोरकर

चंद्रपूर (Chandrapur) 23 जुलै :- संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून होते, परंतु आजचे बजेट हा जुन्या घोषणांना नविन फोडणी असल्याची प्रतिक्रिया खासदार धानोरकर (MP Dhanorkar) यांनी दिली आहे.

सदर अर्थसंकल्पाने बेरोजगारांची थट्टा होणार आहे. महिला, शेतकरी यांच्याकरीता कोणत्याही मोठ्या योजना नसल्याची खंत देखील खासदार धानोरकर  यांनी व्यक्त केली.