Puja Khedkar : उत्पन्न कमी दाखवण्यासाठी केला आई-वडिलांचा घटस्फोट

Puja Khedkar : उत्पन्न कमी दाखवण्यासाठी केला आई-वडिलांचा घटस्फोट
Puja Khedkar : उत्पन्न कमी दाखवण्यासाठी केला आई-वडिलांचा घटस्फोट

वा रे लेक !

पुणे (Pune) २३ जुलै:- वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेडकर यांनी कमी उत्पन्न दाखवण्यासाठी आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवले. केंद्र सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.खेडकर यांच्या कारनाम्यांची यादी वाढतच चालली आहे. यापूर्वी त्या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रांबाबतही वाद निर्माण झाला होता.मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट खरा आहे का, याची चौकशी केंद्र सरकारने पुणे पोलिसांना करायला सांगितली आहे.

मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल असून, त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.दरम्यान, पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केली होती. (Central government) या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठवले, परंतु त्या दोन्ही वेळा अनुपस्थित राहिल्या. पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. व्हाट्सअप मेसेजसुद्धा त्यांना पोहोचला नाही.

दिल्लीत यूपीएससीच्या वतीने खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांना उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस बजावली असून, स्पष्टीकरण मागितले आहे. खेडकर यांनी दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु तिथेही त्या अनुपस्थित राहिल्या आहेत. अटकेच्या भीतीने त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. आयएएसअधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून आदेशानुसार चौकशी सुरू होत असल्याने पुढील कायदेशीर कारवाई कशा प्रकारे होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Puja khedkar disability
Puja khedkar husband
Puja khedkar story
Pooja khedkar instagram
Puja khedkar age
Puja khedkar wiki
Puja khedkar latest news
Puja khedkar hindi