Home Breaking News Ahmednagar : साथीचे आजार वाढण्याची शक्यता

Ahmednagar : साथीचे आजार वाढण्याची शक्यता

Ahmednagar : साथीचे आजार वाढण्याची शक्यता
Ahmednagar : साथीचे आजार वाढण्याची शक्यता

 

अहमदनगर (Ahmednagar) 22 जुलै :- पावसाळा सुरू झाला असून साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.यासाठी महापालिकेने शहरांमध्ये आरोग्य बाबत उपयोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी.डेंगू,मले रिया,गोचीडताप, थंडी ताप,व्हायरल इन्फेक्शन आदी आजाराचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात आढळत आहे.तरी यावर उपयोजना म्हणून औषध व धूर फवारणी करावी,अशी मागणी माजी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केली आहे.

मानवता सेवा संस्थेच्या वतीने साथीच्या आजाराबाबतच्या उपाययोजना संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,दैनंदिन स्वच्छता करून कचऱ्याचे ढग तातडीने उचलावे आणि नवीन वसाहतीमध्ये मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा.काही ठिकाणी पथदिवे बंद पडले असून ती तातडीने सुरू करावी अश्या विविध मागण्या अहमदनगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे मानवता सेवा संस्थेच्या वतीने निवेदना द्वारे माजी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केली.

 

Ahmednagar in marathi
Ahmednagar wikipedia
Ahmednagar old name
Ahmednagar Map
www.ahmednagar.nic.in recruitment
Ahmednagar district area
z.p. ahmednagar gov in
ahmednagar.nic.in talathi