Amit Shah On Sharad Pawar : शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार

Amit Shah On Sharad Pawar : शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार
Amit Shah On Sharad Pawar :

 

पुणे (Pune) :- भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केला आहे . आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात घेतली होती. दरम्यान, अमित शाहांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांनी आरोप केलेले डर्टी डझन नेते आज त्यांच्यासोबत सत्तेत बसले आहेत, असं सुळे म्हणाल्या आहेत.

अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) साहेबांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने पवार साहेबांना सन्मानित केलेलं आहे. डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली. त्यातील डर्टी डझन असणारे नेते आज अमित शाहांच्या भाजपचे राज्याचे मंत्री आहेत किंवा पदाधिकारी आहेत. आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शाहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आता यांनी तर चक्की पिसिंग ही लाईन धरली होती. हे तुम्हीच तपासा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.