Home Breaking News Maha Metro and Vidarbha Literary Festival : निबंध लिहा आणि १ लाख...

Maha Metro and Vidarbha Literary Festival : निबंध लिहा आणि १ लाख पर्यंतच बक्षीस मिळवा

Maha Metro and Vidarbha Literary Festival : निबंध लिहा आणि १ लाख पर्यंतच बक्षीस मिळवा
Maha Metro and Vidarbha Literary Festival :

 

नागपूर (Nagpur) ०८ जुलै :-  महा मेट्रो आणि विदर्भ लिटररी फेस्टिव्हलच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धेचा विषय “माझे नागपूर माझी मेट्रो” असून मेट्रोचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे किंवा नागपूरचे भविष्य कसे घडवणार हे तुम्ही पाहता तसेच तुम्ही मेट्रो का वापरता किंवा का वापर करत नाही हे आम्हाला निबंधाच्या माध्यमाने मांडण्या करिता अशी अनोखी स्पर्धा आयोजित केल्या गेली आहे.

सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन असून जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडण्याचा महा मेट्रोचा मानस आहे तसेच नागरिकांचे मनोगत जाणून घेण्याकरिता सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत.

सदर स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांकरता खुली असून मराठी. हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये निबंध लिहू शकतात. या स्पर्धेचा कालावधी १ ते ३१ जुलै पर्यंत असून २५०-५०० शब्दामध्ये निबंध लिहू शकता. निबंध जमा करण्याकरिता खापरी, लोकमान्य नगर आणि सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथील तिकीट काउंटर येथे ड्रॉप बॉक्स मध्ये जमा करू शकता. तसेच nmetro.contest@gmail.com ई-मेल वर देखील “माझे नागपूर माझी मेट्रो” निबंध पाठवू शकतात.(My Nagpur My Metro)  २० सर्वोकृष्ट निबंधाना १ लाख रुपये पर्यंतचे आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे. जास्तीत जास्ती नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

Nagpur Metro map
Nagpur Metro stations list
Nagpur Metro app
Nagpur Metro Route and time table
Nagpur Metro Phase 2
Nagpur Metro stations list PDF
Maha Metro NagpurIs Nagpur a metro city