Home राष्ट्रीय Worli hit and run : मिहीरला १६ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Worli hit and run : मिहीरला १६ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Worli hit and run : मिहीरला १६ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Worli hit and run : Mihir Shah

मुंबई (Mumbai) १६ जुलै:- मुंबईतील वरळी अपघात प्रकरणात प्रमुख आरोपी मिहीर शाह याला आज (१६ जुलै) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने मिहीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.७ जुलै रोजी, मिहीर शाह मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवत असताना वरळीतील कावेरी आणि प्रदीप नाखवांना उडवले. अपघातात कावेरी नाखवांचा मृत्यू झाला, तर प्रदीप गंभीर जखमी झाले.(Worli hit and run)घटनेनंतर मिहीर फरार झाला आणि तीन दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते.

दाढी आणि केस कापून, तसेच फोन बंद ठेवून मिहीरने पलायन केले होते. गुन्हे शाखेने ६० तासांच्या तपासानंतर त्याला अटक केली. त्याच्या आई आणि दोन बहिणींचीही अटक करण्यात आली, कारण त्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते.मिहीर शाह शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, मिहीरला पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल.

Worli hit and run victim
Bmw hit and run case cctv
pune hit and run case
porscheRajesh Shah
Mihir Shah