Home Breaking News Chhagan Bhujbal : अचानक शरद पवारांची भेट का घेतली

Chhagan Bhujbal : अचानक शरद पवारांची भेट का घेतली

Chhagan Bhujbal : अचानक शरद पवारांची भेट का घेतली
Chhagan Bhujbal : अचानक शरद पवारांची भेट का घेतली

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण काय आहे? यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

आरक्षण प्रश्नी पवारांनी लक्ष घालावं- भुजबळ
राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना आठवण करून दिली. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तेव्हा मराठवाडा शांत करून तुम्ही निर्णय घेतला. सरकारचं काय होईल ते होईल आपण हे काम केलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव जोडलं. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही आलाच नाही. मुख्यमंत्री जरांगेंना भेटले काय चर्चा केली. काय आश्वासने दिली हे आम्हाला माहीत नाही, असं पवार म्हणाले. तुम्ही हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले असल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे

 

Chhagan Bhujbal cast
chhagan bhujbal, son
Chhagan Bhujbal contact number
Chhagan Bhujbal daughter
Chhagan Bhujbal Wikipedia
Chhagan Bhujbal family
Chhagan Bhujbal WhatsApp number
Chhagan Bhujbal age