Amravati Hit & Run : सिटी बसने चौघांना चिरडले

Amravati Hit & Run : सिटी बसने चौघांना चिरडले
Amravati Hit & Run : Accident

9 वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

अमरावती(Amravati):- शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडलीय. यात एका 9 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश असून त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर (Science Core Ground) ही घटना घडलीय. त्यामुळे अमरावतीत देखील आज नव्यानं हीट अँड रनची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

या भीषण अपघाताच्या घटनेनंतर जमावाकडून बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तर प्रीतम गोविंद निर्मळे या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावरच मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय. तर 60 वर्षीय नर्मदा निर्मळे आणि 14 वर्षीय वैष्णवी संजय निर्मळे, नेहा संतोष निर्मळे या तिघांचीही प्रकृती आत्यावस्थ असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर नागरिकांचा रोष लक्षात घेता सध्या सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संतप्त जामावाने केली बसची तोडफोड  

सकाळच्या सुमारास शिरसगाव कसब्यातील रहिवासी असलेल्या एक आजी आपल्या एक नातू आणि दोन नातीनसोबत सायन्स कोर्सच्या बस डेपो परिसरातून जात असताना एका सीव्हीसी बसने यांना धडक दिली. धडकेत नऊ वर्षीय मुलगा बसच्या मागच्या चाकाखाली आला. परिणामी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. तर एका नातीला गंभीर स्वरूपात मार लागला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर मृतक मुलाचे प्रेत पुढील कारवाईसाठी रवाना करण्यात आले आहे. सध्या घडीला परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. हा नेमका अपघात कशामुळे झाला याचाही तपास सध्या पोलीस करत आहे. अशी माहिती सिटी कोतवाल पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी दिली