Home राजकारण Pankaja Munde : मुंबईत निकाल, परळीत गुलाल

Pankaja Munde : मुंबईत निकाल, परळीत गुलाल

Pankaja Munde : मुंबईत निकाल, परळीत गुलाल
Pankaja Munde :

निवडणूक जिंकल्यानंतर पंकजा मुंडेंची बोलकी प्रतिक्रिया

बीड (Beed) :-  भाजपने विधानपरिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडेंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला असून आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडल आहे. संसदीय राजकारणात विजयाचा गुलाल पुन्हा उधळण्यासाठी पंकजा मुंडेंना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. यापूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे  यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर, भाजपने 2024 मध्ये त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. मात्र, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेर, विधानपरिषदेच्या निवडणुकीतून त्या पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात पोहोचल्या आहेत.

पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) विजयाचा मुंडे कुटुंबीयांसह मुंडे समर्थकांनाही अत्यानंद झाला आहे. मुंडे कुटुंब आज विधानपरिषदेच्या निकालावेळी सभागृहात दिसून आलं. यावेळी, प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं दिसून आलं. दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या मूळगावी म्हणजे परळीतही मुंडे समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला. परळीतील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेच्या विजयानंतर घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. तर, आपला विजय कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला आहे. परळीतील पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मुंडे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी मुंडे समर्थकांमधून होत होती. अखेर आज विधानपरिषदेवर पंकजा मुंडे निवडून आल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. गेल्याच महिन्यात लोकसभा निवडणुकीत (Legislative Council Elections) पंकजा यांचा पराभव झाला होता, त्यानंतर महिनाभरातच पंकजा मुंडेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

Gopinath Munde cast

Gopinath Munde daughter
Gopinath Munde family
Munde family tree
Panditrao Munde