Home Breaking News विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi...

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान

गणपत गायकवाड यांच्यावरून राजकारण तापलं

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे.सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान पार पडले. निकालही आज रात्रीपर्यंत जाहीर होईल. महायुतीचे 9 व महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस व उद्धवसेनेच्या उमेदवारांना विजयाची खात्री आहे. 12 उमेदवार रिंगणात आहे. सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंग ची भीती सतावत आहेत. त्यातच भाजपने एक नामी शस्त्र बाहेर काढले आहे. उल्हानगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना या निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर येत आहेत. त्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांनी भाजपसह महायुतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

नवाब मलिक यांचा जामिनाचा शेवटचा दिवस

सुप्रीम कोर्टात सुनावणी

विधीमंडळातून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकला जातो, त्या विधीमंडळात आज विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची मतांची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच क्रॉस व्होटिंग, घोडेबाजाराच्या चर्चांचाही धुरळा सध्या राज्याच्या राजकारणात उडाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचा आज जामिनाचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपिठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

—————–
मराठ्यांची अडवणूक करु नका

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करु नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ECBC च्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय, अधिकारी देखील जातीयवादी आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले. सरकारचे डोळे दोन बोट घालून उघडीन, मग त्यांना दिसेल असंही जरांगे पाटील म्हणाले.
—————–
मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे उपोषण

मविआचा जाहीर पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असतानाही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्याच्या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत.
————–

 

थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

महाराष्ट्र सरकारचं वाढलं टेन्शन

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणामध्ये आता थेट केंद्र सरकारने लक्ष घातलं आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची निवड आणि त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग या दोन्ही गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. प्रशिक्षणार्थ असतानाही केबिन, स्वीय सहाय्यक यासारख्या गोष्टींची मागणी करण्याबरोबरच आता दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असो किंवा नॉन क्रिमीलेअरचं प्रमाणपत्र असो साऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
——————-

आमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म

सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री

सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.5 ऑगस्टपर्यंत फॉर्म घेण्याचं आवाहन काँग्रेसनं केलंय. सोलापुरातील कोणत्याही विधानसभेत तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक असाल तर 20 हजार रुपये भरा आणि फॉर्म घेऊन जा. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकीकडे विधान सभेच्या जागेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढत असताना काँग्रेसचा हा निर्णय घेतला आहे.
—————–

जामीन मंजूर, पण सुटका होणार नाही!

अरविंद केजरीवाल प्रकरणात मोठी अपडेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्या 90 दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. जरी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी अरविंद केजरीवाल यांची पूर्ण सुटका झाली नाही. कारण सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही.
—————–
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सुट्टीवर आलेल्या जवानाने हजेरी लावण्याचा केला प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याअनुषंगाने सुरक्षा यंत्राणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही मुंबई पोलीस आणि एनएसजी अधिकार्‍यांची खासगी बैठक होती. या बैठकीला लष्कारातून सुट्टीवर आलेल्या एका जवानाने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. लष्करातून सुट्टीवर आलेला रामेश्वर मिश्रा तिथे हजर होता . वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बैठकीत मिश्राने ब्लेजर, टाय अशी ड्रेसिंग करून हजेरी लावली. . पण त्याच्यावर अधिकाऱ्यांना संशय आला.व त्याने ही बाब हेरली. त्याचवेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फरार झाला.

जीएसटीसह चांदीची लाखाकडे वाटचाल

जुलैमध्ये ५,५०० रुपयांची वाढ!

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम गुरुवारी नागपूर सराफा बाजारात दिसून आला. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने नागपुरात एकाच दिवसात प्रतिकिलो १,६०० रुपयांची वाढ होऊन भाव ९४,२०० रुपयांवर पोहोचले. तीन टक्के जीएसटीसह चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. गुरुवारी सोने २०० रुपयांनी वाढून ७३,१०० रुपयांवर पोहोचले. जुलै महिन्यात अकरा दिवसात चांदीच्या दरात तब्बल ५,५०० रुपयांची वाढ झाली. सराफांकडे तीन टक्के जीएसटीसह चांदीचे भाव ९७,०२६ रुपयांवर पोहोचले असून लाखाकडे वाटचाल सुरू आहे.