New Delhi : केजरीवालांच्या सुटकेसाठी या तारखेला अंतिम निर्णय

New Delhi : केजरीवालांच्या सुटकेसाठी या तारखेला अंतिम निर्णय
New Delhi: Final decision for Kejriwal's release on this date

केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली( New Delhi)12 जुलै :- दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलाय. परंतु, केजरीवाल सध्या सीबीआयच्या कोठडीत असून त्याप्रकरणी 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अंतरिम जामीन मिळूनही त्यांना जेलमध्येच रहावे लागणार आहे.
केजरीवाल यांना कोर्टाने पीएमएलए कायद्यानुसार ईडीने अटक केलेली त्या प्रकरणात
जामीन दिला आहे. परंतु, सध्या केजरीवाल सीबीआयच्या कोठडीत आहेत.

यामुळे त्यांना जामीन मिळाला तरी देखील ते बाहेर येऊ शकणार नाहीत. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यामध्ये आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर होती, असा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी केजरीवालांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपविली आहे. यावर आता 3 न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी घेणार आहे.

यासाठी 3 न्यामूर्तींची नेमणूक होणार आहे. या सुनावणीपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टानेही जामीन दिला होता. परंतू, ईडीने हायकोर्टात धाव घेत तो रद्द केला होता. केजरीवालांचे वकील विवेक जैन यांनी सांगितले की, सीबीआयशी प्रकरणावर 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीच्या निकालानंतरच केजरीवाल बाहेर येणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. केजरीवाल तुरुंगात बाहेर येण्याची शक्यता अधिक असल्याचे जैन यांनी सांगितले.

 

Is Arvind Kejriwal IAS
Arvind Kejriwal UPSC rank list
Arvind Kejriwal photo gallery
अरविंद केजरीवाल की बेटी
Delhi Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Office Address and contact number
Arvind Kejriwal qualification IAS
Arvind Kejriwal personal Mobile number