Home Breaking News 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला

1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. एबीपी माझाच्या बातम्यानंतर 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला आहे. माझाच्या बातमीनंतर काही तासात शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दावे फेटाळलेले आहेत. कंपनीने दावे फेटाळण्याचे दिलेले कारण योग्य न वाटल्यास कृषी विभाग कंपनीवर कारवाई करणार आहे. वेळप्रसंगी विमा कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देखील जिल्हा कृषी अधीक्षक देशमुख यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने 70 टक्के शेतकऱ्यांचे दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. आता 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला आहे.