Home क्राईम वाढदिवसाच्या दिवशी दोस्तांनी घेतला जीव

वाढदिवसाच्या दिवशी दोस्तांनी घेतला जीव

दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव

उल्हासनगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये दारुवरुन वाद झाला, आधी बाचाबाची झाली, त्यानंतर हा वाद धक्काबुक्की झाली. वाढदिवसाच्या पार्टीतच दारुवरून वाद झाल्यानं बर्थडे बॉयला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उल्हासनगरच्या चिंचपाडा भागातील ही दुर्देवी घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी याप्रकरणी तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या मजल्यावरुन ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास कऱण्यात येत आहे. कार्तिक वायाळ असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. 27 जून रोजी कार्तिक वायाळ याचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणामुळे चिंचवाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.