Home Breaking News Bhandara : शॉट सर्किटमुळे घराला आग

Bhandara : शॉट सर्किटमुळे घराला आग

भंडारा २९ जून:- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली असून यात घरातील जीवनावश्यक वस्तूसह मौल्यवान दागदागिने रोख रक्कम जळून खाक झाली आहे.पीडित घर मालकाचे नाव सुधाकर पुरुषोत्तम कठाने असे नाव असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती तलाठी,पोलिस यांना देण्यात आली तलाठी यांनी पंचनामा केला आहे.पीडित घरमालकाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.