Home Breaking News Sanjay Raut : ड्रगचा पैसा सरकारला जातो

Sanjay Raut : ड्रगचा पैसा सरकारला जातो

नाशिक(Nashik) २४ जून:- ड्रगचा पैसा हा सरकारला पुरविला जातो म्हणून माफीयाना पाठीशी घालून राज्यात गुन्हेगारी वाढीस लागल्याची खंत व्यक्त करून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांची दादागिरी लोकसभेत चालणार नाही त्यांना नियमाप्रमाणेच काम करावे लागणार आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावरती आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यामध्ये माफिया मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत कारण त्यांना पोलिसांना पैसे द्यायचे आहेत आणि पोलीस ते पैसे राज्य सरकारमध्ये बसलेल्या उच्चस्पद मंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना देतात असा आरोप करून संजय राऊत म्हणाले की या पैशातूनच सर्व काही चालू आहे.

परवाच्या दिवशी जळगाव मध्ये पैसे वाटण्याचा जो कार्यक्रम झाला तो अशाच मार्गाने आलेल्या पैसे होते ते पैसे वाटून निवडणुका जिंकायच्या आणि आपली ताकद लोकांवर लढायची त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचे अशी रणनीती आखण्यात अशा पैशाचा उपयोग केला जातो असाही आरोप त्यांनी केला आहे.

संसदेच्या सुरू होत असलेल्या अधिवेशनासंदर्भामध्ये संजय राऊत म्हणाले की, आता लोकसभेमध्ये मागील दहा वर्ष विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही बसू दिलं नाही. आता विरोधी पक्ष नेता बनवावा लागेल. त्याची नियुक्ती करावी लागेल आणि आजपर्यंत मोदी शहा जी दादागिरी करत होते ती दादागिरी लोकसभेमध्ये यापुढे चालणार नाही. त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर काहीसं बदलतो धोरण घेतला आहे. पण त्याचा कोणताही उपयोग आता होणार नाही.

राज्य सरकारच्या कारभारावरती टीका करताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळे आता त्यांना जे बांबू दिल्लीतील त्यांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्याच्या विचार केला तर त्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्याची रणनीती तयार केली जात आहे. पण याही निवडणुकीमध्ये आम्ही या गद्दारांना बांबू हे दाखविणारच आहोत असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.