Home Breaking News ‘या’ शहरात झाडाखाली दबून ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

‘या’ शहरात झाडाखाली दबून ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई (Mumbai)२२ जून:- विरार परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसाबरोबरच वाराही तुफान आहे. या पावसात महिलेच्या अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मंजुळा झा (वय – ७० वर्ष) असे या महिलेचे नाव आहे.

मंजुळा या आपल्या नातवाला सोडायला शाळेत गेल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला आणि त्यानंतर अर्नाळा पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली.

अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना चिंचेचे मोठे झाड पडल्याची माहिती मिळाली. पडलेले झाड बाजूला करत असताना त्यांना एका फांदीखाली मंजुळा यांचा मृतदेह आढळून आला.