Home Breaking News Bhandara : बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचाच अपघात,चार जखमी

Bhandara : बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचाच अपघात,चार जखमी

भंडारा :  साकोली वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर वरून साकोलीकडे येणाऱ्या बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने साकोली तालुक्यातील कुंभली येथील मार्तंड खोटेले यांच्या घराला जाऊन बस आदळली तसेच घराला लागूनच असलेल्या दुकानाचे मोठे नुकसान (Great loss to the shop) झाले असून बस मधील चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून यात उमराव मेश्राम,सत्तेशीला कांबळे,सूरज साखरे श्रद्धानंद सनीचर गंभीररित्या जखमी झाले आहेत.जखमींना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.