Home Breaking News On wednesday :-‘या’ योजनेबाबत शरद पवार घेणार बैठक

On wednesday :-‘या’ योजनेबाबत शरद पवार घेणार बैठक

पुणे :- जनाई योजनेच्या पाण्याविषयी येत्या बुधवारी (ता. १२) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत सुपे (ता. बारामती) पाणी प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.सुपे येथे खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार केला. यावेळी जनाई योजनेच्या पाण्याविषयी आढावा बैठक झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, वनिता बनकर, माणिकराव झेंडे, हनुमंत चांदगुडे, सचिन लडकत, समाधान देशमुख, महादेव भोंडवे, ऋषीकेश गाडेकर, बाळासाहेब मेरगळ आदी उपस्थित होते.

उपस्थितांचा सत्कार व निवेदने स्वीकारून सुळे पुढील कार्यक्रमाला निघून गेल्या. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जनाई उपसा जल सिंचन योजनेविषयी आढावा बैठक घेतली.यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘‘निवडणूक कालावधीत पाणी प्रश्न सोडविण्यासंदर्भात शब्द दिला होता, तो पुरा करण्यासाठी आजची आढावा बैठक आहे. शरद पवार येत्या बुधवारी येथे येतील, त्यावेळी पाण्याविषयी तोडगा निघाला पाहिजे. गोंधळ व्हायला नको म्हणून आज सर्व समस्यांची माहिती करून घेतली. योजनेची नेमकी माहिती घेण्यासाठी एका निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.