Home राजकारण Politics : बोलताना भान ठेवा’,.अन् ठाकरे संजय राऊतांवर संतापले

Politics : बोलताना भान ठेवा’,.अन् ठाकरे संजय राऊतांवर संतापले

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे. नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत.आपण हाय कमांडकडे देखील याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले विकास ठाकरे? ‘सामना’मध्ये आज जे प्रकाशित झालं त्यावरून असं दिसतं की संजय राऊत आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये प्रेम दिसतं. पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून बोलताना त्यांनी विचार करावा. गडकरींबद्दल प्रेम असेल तर ते त्यांच्या घरी जाऊन व्यक्त करा, लिखाण केल्यानं लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. भाजप विरोधात लिहितात आणि गडकरींवर प्रेम करतात, ही दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी भान ठेवून बोलावं नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहेत. मी हायकमांडसोबत यावर बोलणार आहे, भाजप विरोधात लढायचं की नाही हे विचारणार आहे’ असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मॉकपोलची मतं क्लिअर न करता नागपूरातील एका बुथवर मतदान झाल्याची बाब उघड झाली. यामुळे इकडची मतं तिकडे आणि तिकडची मते इकडे होण्याचा संशय आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं देखील ठाकरे यांनी म्हटलं आहे.