मुंबई, २३ मे, : कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
Home Breaking News Kolhapur : आ. पाटील यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक...




